PM Narendra Modi : निवडणुका होत राहतील, पण Budget session महत्त्वाचं, मुक्त चर्चा व्हावी : मोदी

Continues below advertisement

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. अशातच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी असं आवाहन केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मी या अधिवेशनात सर्वांचं स्वागत करतो. आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी आहेत.  देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, मेड इन इंडिया वॅक्सिनबाबत जगात एक विश्वास तयार झाला आहे. या अधिवेशनातही यावर मुक्त चर्चा होईल जेणेकरुन जगभरात एक विश्वास तयार होईल अशी चर्चा व्हावी, असं मोदी म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram