
PM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!
Narendra Modi, Delhi : "मी आज वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीमान अण्णा हजारे यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदा वाल्यांची पीडा झेलत होते. आज अण्णा हजारे यांना यापासून मुक्ती मिळाली आहे. ज्या पार्टीच्या जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला." असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सभा घेऊन मोदींनी जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.
दिल्लीत विकास, व्हिजन आणि विश्वासाच विजय झालाय. अराजकता, अहंकार आणि आपदाचचा पराभव झालाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र केलेल्या मेहनतीमुळे हा विजय झालाय. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या विजयाचा शुभेच्छा देतो. दिल्लीतील जनतेने 'आप'दा मुक्त केलं, डबल इंजिन सरकार डबल विकास करणार, असं आश्वासनही नरेंद्र मोदी यांनी दिलं.