Corona Vaccination : विश्वविक्रम! देशात एकाच दिवशी 2.5 कोटी नागरिकांना लसीकरण, पंतप्रधानांकडून कौतुक

Continues below advertisement

नवी दिल्ली : शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. 

या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 कोटी लसी वितरित केल्या होत्या. तो विक्रम भारताने मोडला आहे. भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram