PM Narendra Modi Congress : 1974मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने बेट श्रीलंकेला दिल्याचा आरोप

PM Narendra Modi Congress : 1974मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने बेट श्रीलंकेला दिल्याचा आरोप  बेटाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. १९७४ मध्ये हे बेट तत्कालीन सरकारने  कराराद्वारे श्रीलंकेच्या ताब्यात दिलं होतं. त्यानंतर आता मोदी सरकारने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी यावरुन काँग्रेसवर घणाघाती टीका केली. आता परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही आज पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. 1974 मध्ये भारत आणि श्रीलंकेने सागरी सीमा आखून करार केला. त्यात कच्चाथीवू बेट श्रीलंकेच्या सीमेच्या बाजूला ठेवण्यात आलं, असं जयशंकर म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी तमिळनाडूच्या द्रमुक सरकारवरही हल्लाबोल केला. काँग्रेस आणि द्रमुकने या प्रकरणात हात वर केल्याचा आरोप  परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola