Corona Vaccine | भारतासाठी कोरोनाच्या लढाईतील हे निर्णायक वळण : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या मेहनती शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. डीसीजीआयनं कोरोनावरील सीरम आणि भारतबायोटेकच्या लसींना आपातकालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. कोरोना विरोधातील उत्साही लढा मजबूत करण्यासाठी हा निर्णायक टप्पा असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. हो निर्णय निरोगी आणि कोविड-मुक्त देश होण्याच्या वाटचालीकडे वेगाने जात असल्याचं द्योतक आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, या कोरोना काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि सर्व कोरोना योद्ध्यांच्या कृतज्ञतेसाठी मी व्यक्त करतो. या योद्ध्यांनी अनेकांचे जीव वाचविल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असं मोदींनी म्हटलंय.