Indian Lockdown | देशातील लॉकडाऊनचा आज फैसला, पंतप्रधानांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. यानंतरही लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. त्यामध्ये लॉकडाऊन वाढणार की संपणार याबाबत निर्णय अपेक्षित आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओने या बैठकीच्या आधी म्हणजेच काल (10 एप्रिल) म्हटलं आहे की, "कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लावलेला लॉकडाऊन हटवण्यात घाई केली तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल."