Coronavirus | आज पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

Continues below advertisement
देशातील लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून 17 मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असणार आहे. अशातच देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊन 17 मे रोजी संपणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आज पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीकडे लागलं आहे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी देशाची तयारी आणि पुढिल रणनितीवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. ही बैठक दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola