PM Modi : पंतप्रधान मोदी आज 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दहा राज्यांमधी 54 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कान्फरन्सिंद्वारे ही बैठक होईल. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार यावर चर्चा करणार आहे. या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पुद्दुचेरी, राजस्थान, झारखंड, ओदिशा, केरळ आणि हरियाणा या राज्यांतील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधणार आहेत. याआधी पंतप्रधानांनी 18 मे रोजी 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली होती.
देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. वाढत्या कोरोना ससंर्गाबाबत पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे. याच साखळीत आता पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करत आहेत. गाव, जिल्हा पातळीवर कोरोनाची परिस्थिती काय आहे याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.