PM Modi On Ram Mandir : राम मंदिरासाठी पंतप्रधान करणार 11 दिवसांचं खास अनुष्ठान
abp majha web team
Updated at:
12 Jan 2024 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRam Mandir Pran Pratistha Special Anushthan : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रतिष्ठापनेसाठीचं (Pran Pratishtha) 11 दिवसांचं अनुष्ठान नाशिकच्या भूमीवरून सुरू करणार आहेत. 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अनुष्ठान करणार असून त्याची सुरुवात आज नाशिकमधून करणार आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक साधू संत, विद्वानांनी सांगितलेल्या 'यम नियमांचे' पालन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी 11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार आहे, ज्याला आजपासून सुरुवात होत आहे.