PM Modi Paid Tribute To Sardar Patel | पंतप्रधानांकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली
सरदार पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त देशातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी पंतप्रधान आणि इतरांनी सरदार पटेल यांचे भारतीय एकीकरणातील योगदानाचे स्मरण केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात असे म्हटले आहे की, "राष्ट्रीय एकता आणि अखंडता यांचे अग्रदूत लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना विनम्र श्रध्दांजली.'' राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पतप्रधानांनी गुजरातमधील केवडिया येथे आयोजित एकता दिवस समारंभात भाग घेतला.