PM Modi on Subhashchandra Bose : नेताजींनी स्वातंत्र्यासाठी कधीच इंग्रजांपुढे भीक मागितली नाही

Netaji Jayanti 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचं अनावरण झालं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेटवर होलोग्राम प्रतिमेचं अनावरण करण्यात आले आहे. याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. प्रतिमेचं अनावरण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनही केलं. यावेळी त्यांनी नेताजींच्या देशप्रेमाबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या कार्याला अभिवादनही केलं. नेताजींनी स्वातंत्र्यासाठी कधीच इंग्रजांपुढे भीक मागितली नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन करताना केलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola