PM on Odisha Train Accident : रेल्वे अपघातामधल्या दोषींवर योग्य ती कारवाई करणार- मोदींकडून आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोमंडल एक्स्प्रेसला अपघात झालेल्या स्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांचीही विचारपूस केली. कोरोमंडल एक्स्प्रेसचा ओडिशातील बालासोर जिल्ह्यात काल संध्याकाळी सातच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर मोदींनी आज दुपारी चार वाजता अपघातस्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच अधिकारी आणि इतरांशीही संवाद साधून माहिती घेतली.
Tags :
PM Narendra Modi Pmo Odisha Train Accident NDRF Ashwini Vaishnav Ajit Pawar NDRF Ministry Of Railways Coromandel Express Collision