PM Modi on No Confidence Motion : संसदेतील अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदी उत्तर देणार
सध्या संसदेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे . आज या चर्चेचा तिसरा दिवस आहे. कालचा दिवस संसदेत फारच वादळी ठरला.. काल सत्ताधारी आणि विरोधी एकमेकांविरोधात चांगलेच भिडलेत..तसंच राहुल गांधींनी केलेल्या वर्तनामुळे सचिवालयाकडे तक्रारीही आल्या. त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई होणार का? हेही आज पहावं लागणार आहे. तसंच आज विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. आज नरेंद्र मोदी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास बोलण्याची शक्यता आहे.