International Yoga Day | कोरोनाच्या संकटात योगाभ्यास महत्त्वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य होणार नसल्याने लोकांनी डिडीटल माध्यमातून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योग दिवस घरीच कुटुंबासमवेत साजरा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ याला प्रोत्साहन दिले आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसनं श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रत्येकानं प्राणायमाला दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं. कोरोनाबाधितांना यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते, असंही मोदी म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola