केंद्राने पुरवलेले व्हेंटिलेटर वापराविना पडून, पंतप्रधानांकडून नाराजी; तातडीने ऑडिट करण्याचे आदेश
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अनेक राज्यात पीएम केअर फंडच्या माध्यमातून मिळालेले व्हेंटिलेटर धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेतली. केंद्राने पुरवलेल्या व्हेंटिलेटरचा वापर, सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.