PM Modi | पारदर्शक मंचाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, प्रामाणिक करदात्यांसाठी सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल
Continues below advertisement
आजपासून प्रामाणिक करदात्यांसाठी 21व्या शतकातील टॅक्स सिस्टमची नवी व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन - ऑनरिंग द ऑनेस्ट' (पारदर्शक कराधान मंच) नावाच्या एका मंचाचं लोकार्पण केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या प्लॅटफॉर्ममध्ये Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter यांसारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. Faceless Assessment आणि Taxpayers Charter आजपासून लागू करण्यात आले आहेत. तर Faceless appeal ची सुविधा 25 सप्टेंबर म्हणजेच, दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशभरात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येईल.'
Continues below advertisement
Tags :
Tax Returns New Income Tax Rules PM Modi Taxation Reforms New Tax Payer Charter Transparent Taxation Income Tax Reforms 5 Trillion Economy PM Modi Speech India PM Modi