Tax on Bonus : दिवाळी बोनस आणि भेटवस्तूंवरही टॅक्स

Continues below advertisement

वाढत्या महागाईच्या काळात दिवाळीचा बोनस आणि भेटवस्तू स्वीकारणाऱ्या नोकरदारांना केंद्राने जोरदार झटका दिलाय... आता दिवाळी सणाच्या निमित्ताने मिळणाऱ्या बोनस आणि भेटवस्तूंवरही टॅक्स लावला जाणार आहे. दिवाळीत मिळालेला बोनस आणि महागडय़ा भेटवस्तूंची माहिती आयकर विवरणपत्रात देणे बंधनकारक असून तसे न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. आयकर कायद्याच्या कलम 56(2) नुसार आर्थिक वर्षात मिळालेल्या भेटवस्तूंवर स्लॅब दरानुसार 'इतर स्रोतांकडून मिळकत' म्हणून कर आकारला जाऊ शकतो. जोडीदार, भावंड, पालक, सासू-सासरे यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram