PM Modi France Tour : पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर, नौदलासाठी 26 राफेल विमाने खरेदी करणार
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. काल ते पॅरिसमध्ये पोहोचले. मोदींच्या या फ्रान्स दौऱ्यात नौदलासाठी 26 राफेल फायटर जेट आणि 3 स्कॉर्पिन पाणबुडय़ा खरेदीचा करार होण्याची शक्यता आहे. 5.5 अब्ज युरोचा हा करार असणार आहे. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर हा करार होईल. 26 राफेल लढाऊ विमाने फ्रान्सकडून खरेदी करण्यास संरक्षण विभागाच्या डिफेन्स अॅक्विजिशन कौन्सिलने यापूर्वीच मान्यता दिलीय.
Continues below advertisement