PM Modi UNCUT : आता घरोघरी लसीकरण, कोरोनाविरोधातील लढाईत पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र ABP Majha

Continues below advertisement

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण  (Covid Vaccine) झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि  दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला व्हर्चुअली उपस्थित होते. सोबतच झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय  या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. 

बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लसीकरणाच्या मोहिमेला अजून वेग द्यायचा आहे. आता 'हर घर टीका, घर घर टीका' याअंतर्गत लसीकरण मोहिम चालवली जाईल. लसीकरणासाठी धर्मगुरुंची मदत घ्या. धर्मगुरुंचे लसीकरणासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल करा तसेच एनएसएस, एनसीसीची मदत घ्या, असंही आवाहन मोदी यांनी केलं. बिरसा मुंडा जयंतीला आदिवासी बहुल भागात विशेष लसीकरण मोहिम चालवा असं आवाहनही त्यांनी केला. मोदी यांनी म्हटलं आहे की, 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीनं देशासमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. आता आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी इनोव्हेटीव्ह पद्धतीवर जास्त काम करावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram