Union Cabinet | केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, एनपीआर अपडेटवर निर्णयाची शक्यता | ABP Majha
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरुन (नॅशनल रेजिस्टर ऑफ सिटीजन्स) देशभरात गदारोळ, आंदोलने सुरु असतानाच आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एनपीआर (नॅशनल पॉप्युलेशन रेजिस्टर) अपडेट करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयावरुनही गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. त्यामुळे सरकार लवकरच एनआरपी अपडेट करण्याचं काम सुरु करण्याची शक्यता आहे.