PM Modi Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पंतप्रधान मोदींनी भाकरी फिरवली

Continues below advertisement

PM Modi Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व नवे मंत्री आज आपल्या पदभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. नव्या मंत्रिमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मंत्रिपरिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यामध्ये कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री सहभागी होती. काउंसिल ऑफ मिनिस्टर्स (मंत्रिपरिषद) च्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं विजन जाहीर करणार आहेत. 

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. आता विविध खात्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलात सात राज्यमंत्र्यांचा पदोन्नतीसह मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. एकूण 15 सदस्यांना कॅबिनेट मंत्री आणि 28 जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे यांच्यासह आठ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. एकूण 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांची संख्या पंतप्रधानांसह 78 इतकी आहे. 

पंतप्रधान म्हणून मे 2019 मध्ये 57 मंत्र्यांसह आपला दुसरा कार्यकाळ सुरु केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपरिषदेत फेरबदल आणि विस्तार केला आहे. या फेरबदल आणि विस्तारापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीअमित शाह, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram