Kashi Vishwanath : गंगेच्या काठी भाविकांकडून 'हर हर गंगे, हर हर मोदी' च्या घोषणा
Continues below advertisement
PM Modi Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण झाले आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी वाराणसीत सकाळी 11 वाजता दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी काशीच्या कालभैरव मंदिरात आरती केली. त्यानंतर क्रूझमधून त्यांनी गंगासफर देखील केली. त्यानंतर मोदींनी गंगा नदीत स्नान करून अर्घ्य अर्पण केलं. नंतर त्यांनी काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात बसून पूजा आणि अभिषेकही केला. त्यानंतर जाहीर कार्यक्रमात मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण केले आहे.
Continues below advertisement