Women Reservation Bill : केंद्रीय कॅबिनेटमध्ये महिला आरक्षणाला मंजुरी, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
Continues below advertisement
देशभरातील तमाम महिलांच्या दृष्टीनं अतिशय मोठी बातमी आहे. संसदेत महिला आऱक्षणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, अशी घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नव्या संसदेत प्रवेश केल्यावर ते बोलत होते. यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागणार आहे, आणि त्याबाबतचं विधेयक मोदी सरकार संसदेत मांडणार आहे. लोकसभेत उद्याच हे विधेयक मांडलं जाईल अशी अपेक्षा आहे. विधेयक मंजूर झाल्यावर संसद आणि राज्यांमधील विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण असेल. मात्र याची अंमलबजावणी तातडीनं होणार नाही, तर २०२६मध्ये नियोजित मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर महिला आरक्षण लागू होईल, असं तज्ज्ञ सांगतायेत.
Continues below advertisement