Terrorist : काश्मीरमध्ये पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा डाव उघडकीस, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
abp majha web team
Updated at:
02 Dec 2021 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीरमध्ये पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा डाव उघडकीस आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी काल दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यानंतरच्या चौकशीत दहशतवाद्यांचं हे मोठं षडयंत्र समोर आलंय. ४० किलो स्फोटकांपासून आयईडी बनवून ऐरीगम लेसीपूर रस्त्यावर पुलवामासारखा घातपात घडवायचा डाव होता अशी माहिती समोर आली आलीय. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा सहकारी अबू रफिया याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेतायत. तसंच दहशतवाद्यांनी आणलेली स्फोटकं कुठे लपवली याची चौकशीही गुप्तचर यंत्रणा करत आहेत.