Corona Vaccine : Pfizer, Moderna, BioNTech ची प्रति सेकंदाला 1 हजार डॉलर्सची कमाई ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाचा कहर रोखण्यात लस कंपन्यांचं मोठं योगदान आहे. जगभरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या कोरोना लस निर्मिती करणाऱ्या परदेशी कंपन्यांचा नफा प्रति सेकंदाला वाढतोय. फायझर, मॉडर्ना आणि बायोएनटेक या तीन कंपन्यांचा एकत्रित एका मिनिटाचा नफा ६५ हजार डॉलर्स म्हणजेच प्रति सेकंदाला या कंपन्या एक हजार डॉलरपेक्षा जास्त नफा कमावतायत. आफ्रिकन देशामध्ये काम करणाऱ्या 'पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स' या संस्थेने याबाबतचा अहवाल तयार केलाय. कोरोनाचा कहर जगभर सुरू होता. त्यामुळे लसींची गरज सर्वच देशांना आहे. मात्र फायझर, मॉडेर्ना आणि बायोएनटेक या तीन कंपन्यांनी जादा नफा कमविण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससारख्या श्रीमंत देशांनाच लस पुरवठा केला असंही या अहवालात नमूद केलंय. या तीन कंपन्यांचा एकत्रित नफा प्रति सेकंद एक हजार डॉलर्स तर प्रति दिवसाला ९ कोटी ३५ लाख डॉलर्स इतका आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram