Petrol Diesel Rates Reduced: पेट्रोल डिझेल स्वस्त, कांदाही स्वस्त होणार, कर्जातही मिळणार सवलत
Petrol-Diesel Price Today 04 November 2021, iocl.com : केंद्र सरकारच्या वतीनं देशातील जनतेला दिवाळीचं (Diwali 2021) मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. काल (बुधवारी) केंद्रीय अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) दोन्ही इंधनाच्या दरांवरील सेंट्रल एक्साइज ड्यूटी (Excise Duty Cut) मध्ये घट करणार असल्याची घोषणा केली होती. पेट्रोलवर यामध्ये 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे आज मुंबईतील एक लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
Onion Rate : पेट्रोल-डिझेलबरोबरच आता कांदाही स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळं कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा 40 ते 45 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय. बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचं बोललं जातं आहे.