Petrol-Diesel : नागरिकांना केंद्र सरकारची दिवाळी भेट, पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त
Continues below advertisement
देशभरातील सामान्य जनता महागाईने भरडली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. ही त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने नागरिकांना एक प्रकारची दिवाळी भेट दिल्याची चर्चा सुरु आहे.
Continues below advertisement