Petrol Diesel Price : पेट्रोल 9.50, डिझेल 9 रुपयांनी स्वस्त,केंद्रीय अबकारी दर कमी केल्याने दिलासा

Continues below advertisement

Petrol Diesel Price Today 22 May 2022 : महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा कपात (Petrol Diesel Price) केली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol Price) 9.50 रुपयांनी आणि डिझेल (Diesel Price) 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram