Narendra Modi | परदेशातला ट्रेंड भारतातही राबवला जाऊ शकेल?

संपूर्ण जगाला ज्याचं खुळ लागलंय... त्या सोशल मीडियाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वैतागले आहेत का? हा सवाल उपस्थित करण्यामागचं कारण ठरलंय खुद्द नरेंद्र मोदींनी केलेलं ट्विट... येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय. लवकरच तुम्हाला यासंदर्भात कळवेन असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. त्यानंतर सोशल मीडियावर नोसर कँपेन सुरु झालंय. मोदींनी सोशल मीडिया सोडू नये अशी विनंती करणारे ट्विट सुरु झाले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सोशल मीडियावर सर्वात जास्त फोलोअर्स असलेल्या नेत्यांमध्ये मोदींचा समावेश होतो.. तसंच कोणत्याही मोठ्या निर्णयाची माहिती देण्यासाठी नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मीडियाचा वापर होतो. मात्र नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola