Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन मोठी विधयकं पटलावर
क्रिप्टोकरन्सी.... महिन्यात एखाद्याला कोट्यधीश करणारी, तर काही जणांना कंगालही करणारी... सध्या जगभरातल्या आर्थिक वर्तुळाक क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे. मात्र केंद्र सरकार खासगी क्रिप्टोकरन्सीला चाप लावून, भारताचं अधिकृत डिजिटल आणि आभासी चलन आणण्याच्या तयारीत आहे. २९ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहेय... येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधयेकांमध्येतीन कृषी कायदे रद्द करणाऱ्या विधेयकाचाही समावेश आहे... शेतकऱ्यांच्या विरोधानंतर कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा स्वतः पंतप्रधान मोदींनी केली आहे.,