Pakistan : राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानात महागाईचा भडका, पाकिस्तानची जनता हवालदिल
Continues below advertisement
आता बातमी आहे पाकिस्तानातून... भारताविरोधात कायम आगपाखड करणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना देशात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. कारण पाकिस्तान सध्या महागाईनं हवालदिल झालाय. पाकच्या नागरिकांना एक लिटर दुधासाठी तब्बल १५० रुपये मोजावे लागतायत. तर साखर १०० रुपये प्रतिकिलोवर गेलेय. तर अंडी, कणिक, टॉमेटॉ, बटाटे, कांदे यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तानातील विरोधी पक्ष त्यामुळे इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. तर भारतावर टीका करत इम्रान खान यांचा या महागाईच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Continues below advertisement