PM Modi Cabinet Expansion : देशाची प्रतिमा वैश्विक पातळीवर मलीन झाल्यानं तीन केंद्रीय मंत्र्यांना डच्चू?
Continues below advertisement
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Continues below advertisement