President Election साठी Nitish Kumar विरोधकांचे उमेदवार? Prashant Kishor यांचे प्रयत्न सुरू

Continues below advertisement

देशात भाजपविरोधात आघाडी तयार करण्याचा प्रयत्न प्रादेशिक पक्षांकडून होत असताना आता येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठीही विरोधकांच्या एकीचे प्रयत्न सुरु झालेत. त्यासाठी नितीश कुमार यांना विरोधकांकडून उमेदवारी दिली जावी यासाठी प्रयत्न सुरु झालेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून याची सुरुवात केल्याचं समजतंय. केसीआर यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत भाजपविरोधात देशभरात एकच आघाडी करण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला होता. त्यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीसाठी नवी राजकीय समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न सुरु झालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram