Operation Mahadev: पहलगाम हल्ल्याचा बदला, लष्कराच्या कारवाईत 3 दहशतवादी ठार Special Report

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने ९६ दिवसांनी बदला घेतला आहे. लष्कराने काश्मीरमध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'मध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, त्यापैकी दोन दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सामील होते. यासिर आणि सुलेमान अशी त्यांची नावे असून ते पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सिक्युरिटी ग्रुपचे कमांडो असल्याची माहिती आहे. श्रीनगरजवळील दाचीगामच्या जंगलात १५ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून अमेरिकन बनावटीची कार्बाइन आणि एके-४७ जप्त करण्यात आली आहे. या हल्ल्यातील पीडित कुटुंबातील एका व्यक्तीने म्हटले आहे, “मी आपल्या Armyची आणि आपल्या सरकारची खूप आभारी आहे की त्यांनी हे ऑपरेशन केलं, पण माझी अशी इच्छा आहे की जोपर्यंत ते शेवटचे सगळे दहशतवादी तिथे ज्यांनी तो हल्ला केला, त्यांना जोपर्यंत ते मारत नाहीत, तोपर्यंत जे आंतरिक समाधान असतं ना, ते मला मिळालेलं नाहीये.” अजून एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola