Ration Card | एक जूनपासून देशात एक देश, एक रेशनकार्ड | ABP Majha
आता आणखी एक मोठी बातमी.. 1 जूनपासून देशात एक देश एक रेशनकार्ड योजना लागू करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिलीय. ही योजना लागू झाल्यानंतर रेशन कार्ड धारकांना देशातल्या कोणत्याही रेशन कार्ड दुकानातून धान्य आणि इतर खरेदी करता येणार आहे.ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. सध्या रेशन कार्डसाठी १४ राज्यात पॉश मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच लवकरच २० राज्यात आणि केंद्र शासीत प्रदेशात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.