Delhi Wrestlers Protest :ऑलिम्पिक विजेते आंदोलक मेडल गंगेत विसर्जित करणार,आता तरी गुन्हा दाखल करणार?
दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला बसलेले आंदोलक कुस्तीपटू आज आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. आम्ही न्याय मागतोय, पण आमचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होतोय.. त्यामुळे या मेडल्सना काहीही किंमत उरलेली नाही, अशी तीव्र भावना या कुस्तीपटूंनी व्यक्त केली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता हरिद्वारच्या गंगेत आम्ही पदकं विसर्जित करून इंडिया गेटवर उपोषणाला बसू, अशी भूमिका या कुस्तीपटूंनी घेतली आहे.