
Odisha मधील महाभयंकर रेल्वे अपघातामागचं कारण समोर, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याच प्राथमिक अंदाज
Continues below advertisement
ओडिशामधील महाभयंकर रेल्वे अपघातामागचं कारण आता समोर येतंय. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता, असा प्राथमिक अंदाज रेल्वे बोर्डानं व्यक्त केला आहे. रेल्वे बोर्डाच्या सदल्य जया वर्मा सिन्हा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. कोरोमंडल एक्स्प्रेसचा वेग ताशी १२८ किमी होती. ही एक्सप्रेस मालगाडीवर आदळली, आणि मालगाडीत लोखंड असल्यानं अपघाताची तीव्रता वाढली. याचं कारण म्हणजे कोरोमंड़ल एक्स्प्रेसची धडक बसल्यानं मालगाडी दूर फेकली गेली नाही, ती जागेवरच राहिली. यामुळे ट्रेनला बसलेल्या धडकेची तीव्रता वाढली. दुसरं म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा तिथून शालिमार एक्प्रेस जात होती. कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे शालिमार एक्स्प्रेसच्या शेवटच्या दोन डब्यांवर आदळले. अगदी काही सेकंदाच्या फरकानं ही दुसरी टक्कर झाली.
Continues below advertisement