Odisha Railway Accident : ओडीशामध्ये पुन्हा रेल्वे अपघात, मालगाडीखाली 6 मजुरांचा मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 08:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओडिशामध्ये पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना घडलीय. एका मालगाडीखाली ६ मजुरांचा मृत्यू झालाय. ही घटना ओडिशातील जाजपूर रोड रेल्वे स्टेशन भागात काल घडलीय. पावसापासून वाचण्यासाठी काही मजुरांनी थांबलेल्या मालगाडीचा आधार घेतला आणि ते मालगाडीखाली बसले. अचानक इंजनशिवाय मालगाडी सुरू झाली आणि सहा मजुरांचा बळी गेला. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांना रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शिवाय एक मजूर गंभीर जखमी आहे. गेल्या शुक्रवारी कोरोमंडळ एक्स्प्रेसच्या दुर्घटनेत २७५ प्रवासांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ओडिशामध्ये दुसरी रेल्वे दुर्घटना घडलीय