Nupoor Sharma: जगभरात नाचक्की, वादग्रस्त वक्तव्याने गल्ली बोळातून निषेध, कोण आहेत नुपूर शर्मा ABP

सोलपूरात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता, औरंगाबादेत आंदोलन झाली, नवी मुंबई , नाशकात देखील वातावरण तापलं होतं, एवढंच काय तर देशभरातून वेगवेगळ्या शहरांतून लोकांचा आक्रोश बघायला मिळतो. हा भडका कशामुळे उठलाय तर एका पक्षाच्या एका व्यक्तीने केलेल्या एका स्टेटमेंटनंतर….. त्या वक्तव्याचे परिणाम सर्वदूर पाहिल्यानंतर पक्षाने आपले हात बाजूला काढले मात्र, तरीदेखील प्रकरण काही शांत होत नाहीये… काय नेमकं हे वक्तव्य आहे आणि या वक्तव्याला एवढं वजन का मिळालंय? कोण आहोत या व्यक्ती आणि त्या नेमकं बोलल्या काय ज्यामुळे देशभरात एका समाजाच्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola