Zero Hour रायबरेलीतून भाजप नूपुर शर्मा यांना उतरवणार ?

Continues below advertisement

Zero Hour  रायबरेलीतून भाजप नूपुर शर्मा यांना उतरवणार ? भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा तुम्हाला चांगल्याच आठवत असतील. हो ह्या त्याच नुपूर शर्मा आहेत, ज्यांनी एका टिव्ही डिबेटमध्ये काही वक्तव्य केली.. ती इस्लामविरोधी असल्याचा आरोप झाला.. त्यांना मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं... प्रकरण अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. अखेर भाजपनं त्यांचं पक्षातून निलंबितही केलं होतंं. जिहाद्यांनी सर तन से जुदाच्या धमक्या दिल्यामुळे नुपुर शर्मा बरेच महिने अज्ञातवासात सुद्धा होत्या. आता त्याच नुपूर शर्मांना भाजप रायबरेली या काँग्रेसच्या सर्वोच्च मतदारसंघातून उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांची गांधी घराण्याचा बालेकिल्ला अशी ओळख. गेल्या वेळी स्मृती इराणींनी अमेठीचा किल्ला राहुल गांधींकडून भाजपकडे ओढून घेतला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram