UPI ATM Machine : आता यूपीआयच्या मदतीनं कार्डच्या वापराशिवाय कॅश निघणार

तुमच्या खिशातून एटीएम कार्ड येत्या काही काळात नाहीसं झालं तर नवल वाटायला नको. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट पार पडतो आहे आणि यात आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनींनी सहभाग घेतला आहे.  यातच यूपीआय एटीएम मशीन देखील इथं बघायला मिळतंय. त्यामुळे जर तुम्हाला कॅशची गरज पडली तर कार्डचा वापर न करता तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन करत हार्ड कॅश एटीएम मशीनमधून काढू शकणार आहात.  काही मोजक्या बॅंका हे तंत्रज्ञान डेमो स्वरुपात हे वापरत आहेत. मात्र, येत्या काही दिवसात सर्वच बॅंका हे तंत्रज्ञान वापरताना दिसतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola