
Noida Greater Noida Expressway Accident: बाटलीमुळे ब्रेक न लागल्याने दुर्घटना ABP Majha
Continues below advertisement
कारमधील पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाला. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवेवर शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
इंजिनिअर अभिषेक झा हे मित्रासोबत ग्रेटर नोएडाला निघाले होते. ते स्वत: कार चालवत होते. त्यावेळी कारच्या सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बाटली अभिषेक यांच्या पायाखाली आली. त्याचवेळी समोर ट्रक पाहून अभिषेक यांनी गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक लावला. पण पाण्याची बाटली ब्रेक पेंडलखाली आल्यानं ब्रेक लागला नाही आणि कार ट्रकवर आदळली. त्यात अभिषेक झा यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झालाय.
Continues below advertisement