Indian Lockdown | Coronavirus | लॉकडाऊन वाढणार नाही; केंद्रीय सचिव राजीव गाबा
गेल्या दोनतीन दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमांच्या रिपोर्टमधून 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्यांचं केंद्रीय सचिव राजीव गाबा यांनी खंडन केलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यता मीडिया रिपोर्ट मधून सांगितल्या जात आहे. तर, सोशल मीडियावर हा लॉकडाऊन मोठ्या कालावधीसाठी वाढण्यार असल्याचे संदेश फिरत आहे. याची दखल घेत केंद्रीय माहिती प्रसारण विभागाने घेत अफवा पसरावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.