सरकारच्या घोषणेनंतरच फ्लाईट बुकिंग सुरु करा, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांचे विमान कंपन्यांना आदेश
Continues below advertisement
एअर इंडियानं आपल्या वेबसाईटवर फ्लाईट बुकिंगबद्दलची माहिती टाकली आणि त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरु करायची याबाबत केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाहीय, याबाबत काही घोषणा झाल्यानंतरच विमान कंपन्यांनी आपले बुकिंग सुरु करावेत, असं ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी केलं आहे.
Continues below advertisement