Nitish Kumar Narendra Modi in NDA Meet : वाकून पाया पडण्याचा प्रयत्न, नितीश कुमारांना मोदींनी रोखलं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी  निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी होत आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन केलं. नितीश कुमार म्हणाले, आमचं मोदींना पूर्ण समर्थन आहे, लवकरात लवकर तुम्ही शपथ घ्या, आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत. यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला, पण पुढच्यावेळी विरोधी सर्व हरतील, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola