Nitish Kumar Bihar : राजद, काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार भाजपसोबत !

Continues below advertisement

Nitish Kumar Bihar : राजद, काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार भाजपसोबत ! बिहारमध्ये नितीश कुमारांचा जेडीयू आणि भाजपची युती जवळपास पक्की झाली आहे, रविवारी शपथविधी होणार आहे असं कळतंय. मात्र या सगळ्या खेळामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. नितीश कुमारांच्या पक्षाचे केवळ ४५ आमदार आहेत, तर लालूंच्या राजदचे ७९ आमदार आहेत. लालू प्रसाद यादव नितीश कुमारांच्या पक्षात फूट पाडणार होते, त्यासाठी ते जेडीयूच्या अनेक आमदारांच्या संपर्कात होते, अशी चर्चा आहे. त्याची कुणकुण लागल्यानं नितीश यांनी आधी चाल खेळत भाजपला संपर्क केला, आणि युतीबाबत बोलणी सुरू केली. भाजपकडे देखील ७८ आमदार आहेत. म्हणजे राजदपेक्षा केवळ एक आमदार कमी आहे. त्यामुळे जेडीयू आणि भाजप अगदी सहज सरकार बनवू शकतात. आणि म्हणूनच पुढचे काही तास बिहारच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram