Nirmala Sitharaman PC | गरीब, गरजूंच्या खात्यात पैसे ट्रान्सफर; अर्थमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद

देशातील गरीब, मजुरांना सरकारकडून मदत दिली जात आहे. गरीबांना जेवण दिलं जात आहे. तसंच कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे. 20 कोटी जनधन खात्यांमध्ये पैसे दिले आहेत. जन धन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर 20,267 कोटी रुपये ट्रांसफर केले आहेत. तसेच गरीबांना आर्थिक मदत दिली जात आहे. 16 हजार 394 कोटी थेट गरजूंच्या खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.  तंत्रज्ञानामुळे तात्काळ पैसे गरजवंतांना दिले गेले असल्याचं त्या म्हणाल्या. आतापर्यंत 6.81 कोटी उज्जवला सिलेंडर वाटले असल्याचं त्या म्हणाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola