Nirbhaya Case | दोषी अक्षय ठाकूरची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळली | ABP Majha
निर्भया बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी दोषी अक्षय ठाकूरची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अक्षयची फेरविचार याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती आर. भानूमती, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने याप्रकरणी आज सुनावणी घेतली होती. या खंडपीठाने अक्षय ठाकूरची फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणी चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. अक्षयच्या बाजूने वकील ए. पी. सिंह यांनी कोर्टाला अक्षयला फाशीची शिक्षा देऊ नका, अशी विनंती केली होती.