Nilam Singh : संसद घटनेतील आरोपी नीलम सिंह हरियाणाच्या जींदमधली
Nilam Singh : संसद घटनेतील आरोपी नीलम सिंह हरियाणाच्या जींदमधली लोकसभेत आज सुरक्षेत मोठी चूक दिसून आली. दोन जणांनी संसदेत घुसखोरी केली. लोकसभा सुरू असताना दोन जण लोकसभेत घुसले. प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी खाली लोकसभेत उड्या मारल्या. लोकसभेत त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल्स जाळल्या. दरम्यान
संसदेतील घटनेतील महिला आरोपी नीलम सिंहची माहिती समोर आली आहे. नीलम ही हरियाणामधील जींद जिल्ह्यातील आहे.. घासोे असं तिच्या गावाचं नाव आहे. गावाजवळच्या उचानामध्ये तिच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे. नीलम डाव्या विचारसरणीची आहे, शेतकरी आंदोलनात देखील ती सक्रिय होती.