Jammu & Kashmir : NIA कडून 45 ठिकाणी छापेमारी; जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या ठिकाणांवर NIA चे छापे
Continues below advertisement
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केलीय. जम्मू काश्मीरमधील १४ जिल्ह्यांमधील ४५ ठिकाणांवर एनआयएने छापेमारी केलीय. जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्यात. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी एनआयएकडून ही कारवाई करण्यात आलीय. पाकिस्तानला तसंच फुटीरतावाद्यांना समर्थन करणाऱ्या जमात-ए-इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने २०१९ मध्ये बंदी टाकलीय. बंदी असतानाही जमात-ए-इस्लामीकडून सुरु असलेल्या कारवाया रोखण्यासाठी एनआयएने ही कारवाई केलीय.
Continues below advertisement